
बिहार राज्यातील घोडासहन येथील घडयाळ चोरीसाठी कुप्रसिध्द गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.
बिहार राज्यातील घोडासहन येथील घडयाळ चोरीसाठी कुप्रसिध्द गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घडयाळ चोरीचा गुन्हा उघडकीस आरोपीकडून 10,62,000/- रू किं.मुद्देमालासह 100 महागडी घडयाळे जप्त प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी संजय लालचंद जैन, वय 61, रा.गुरूद्वारा रोड, कोपरगाव, ता.कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घडयाळाचे दुकान आहे.फिर्यादी हे दिनांक 18/04/2025 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपीतांनी त्यांचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घडयाळे घरफोडी करून चोरून नेले.याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.189/2025 बीएनएस कलम 305 (अ), 331 (4)