October 6, 2025 4:12 pm

October 6, 2025 4:12 pm

Search
Close this search box.

बिहार राज्यातील घोडासहन येथील घडयाळ चोरीसाठी कुप्रसिध्द गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

बिहार राज्यातील घोडासहन येथील घडयाळ चोरीसाठी कुप्रसिध्द गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घडयाळ चोरीचा गुन्हा उघडकीस
आरोपीकडून 10,62,000/- रू किं.मुद्देमालासह 100 महागडी घडयाळे जप्त
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी संजय लालचंद जैन, वय 61, रा.गुरूद्वारा रोड, कोपरगाव, ता.कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घडयाळाचे दुकान आहे.फिर्यादी हे दिनांक 18/04/2025 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपीतांनी त्यांचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घडयाळे घरफोडी करून चोरून नेले.याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.189/2025 बीएनएस कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस ना उघड घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून,गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दि.30/04/2025 रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 189/2025 या गुन्हयाचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास, रा.घोडासहन, बिहार व त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जि.पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त     झाली.पथकाने शिरूर जि.पुणे येथे संशयीतांचा शोध घेऊन 1) सुरेंदर जयमंगल दास, वय 40 वर्षे, 2) रियाज नईम अन्सारी, वय 40 वर्षे 3) पप्पु बिंदा गोस्वामी, वय 44 वर्षे 4) राजकुमार चंदन साह, वय 20 वर्षे 5) राजुकुमार बिरा प्रसाद, वय 45 वर्षे 6) नईम मुन्ना देवान, वय 30 वर्षे 7) राहुलकुमार किशोरी प्रसाद, वय 26 वर्षे 8) गुलशनकुमार ब्रम्हानंद प्रसाद वय – 25 वर्षे, सर्व रा. घोडासहन,ता.घोडासहन, जि.मोतीहारी,राज्य बिहार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांचेकडून 9,81,000/- रू किं.त्यात  टायटन, रागा टायटन, टायमॅक्स कंपनीची 100़ घडयाळे, दोन वायफाय राऊटर, 7 मोबाईल असा एकुण 10,62,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांचेकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी नामे सुरेंदर जयमंगल दास याने ताब्यात मिळून आलेली सर्व घडयाळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी 9) मोबीन देवान रा.घोडासहन, ता.घोडासहन, जि.मोतीहारी, बिहार राज्य (फरार)

याचेसह मागील 12 -13 दिवसापुर्वी कोपरगाव शहरातील एका घडयाळाचे शोरूममधून चोरी केले असून सदरची चोरी करताना त्यांचेकडील मोबाईल व राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगीतली.तसेच गुन्हयातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता चोरीची काही घडयाळे ही  मोबीन देवान याच्या मार्फतीने 10) मुकेश शहा रा. घोडासहन, ता. घोडासहन, जि. मोतीहारी, राज्य बिहार मो.नं. 8521043030 (फरार) यास सदर घड्याळे हे चोरीचे आहेत हे सांगुन कमी किमतीत विक्री केले असुन काही घड्याळे मोबीन देवान याचेकडे असल्याची माहिती सांगीतली आहे.
ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे ? याबाबत विचारपुस करता सुरेंदर जयमंगल दास याने त्याचे वरील साथीदारांनी मिळुन मागील 15 ते 16 दिवसापुर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकलगेट परिसरात रात्रीचे वेळी मोबाईल शॉप फोडुन मोबाईल फोन चोरले आहेत.चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री माहिती सांगीतली.नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.85/2025 बी.एन.एस.कलम 331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.ताब्यातील आरोपीतांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
MJ News 90
Author: MJ News 90

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें